जंगलात दोन महिलांची दगडाने ठेचून क्रूर हत्या.
एस.के.24 तास
जळगाव : जळगाव च्या अमळनेर तालुक्यातील जंगलात दोन महिलांची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलांची हत्या करणाऱ्या आरोपी अनिल संदानशिव याला पोलिसांनी अटक केली असून तो पोलीस कोठडीत आहे.
आरोपी अनिल संदानशिव याने अशाच प्रकारे इतरही महिलांची हत्या केली असावी? या शक्यतेच्या अनुषंगाने जंगल परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे. शोध मोहिमेत जंगल परिसरात आणखी काही संशयास्पद आढळून येते का या दृष्टिकोनातून पोलीस पाहणी करत आहेत.
जळगावच्या अमळनेर तालुक्यात ज्या जंगलात दोन महिलांच्या हत्या झाल्या, त्याच संपूर्ण जंगलामध्ये भर पावसामध्ये अमळनेर पोलीस सर्च ऑपरेशन राबवत असल्याचे पाहायला मिळत आहे. 25 ते 30 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाच्या माध्यमातून जंगलातला प्रत्येत कोपरा हा हुडकून काढला जात आहे.
आणखी काही महिलांचे मृतदेह किंवा मृतदेहाचे अवशेष सापडतात का ? या अनुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांचे माध्यमातून जंगलातील झाडे झुडपात शोध सुरू आहे.