राज्यस्तरीय कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी कवी डॉ.धनराज खानोरकरांची निवड.

राज्यस्तरीय कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी कवी डॉ.धनराज खानोरकरांची निवड.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,२३/०७/२५ येथील आविष्कार साहित्य व संस्कृती मंच दरवर्षी जुर्ले महिन्यात राज्यस्तरीय पावसाचे कविसंमेलन आयोजित करीत असते. यावर्षी पावसाचे कविसंमेलन आविष्कार साहित्य मंच व मराठी वाड्मय मंडळ, ने.हि.महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २७ जुर्ले २०२५ ला स्व.हिरालालजी भैया सभागृहात सकाळी ११.००वा.पार पडत आहे.


या राज्यस्तरीय कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी,लेखक व पत्रकार डॉ.धनराज खानोरकर यांची एकमताने निवड झाल्याचे आविष्कार साहित्य मंचाचे अध्यक्ष कवी गौतम राऊत आणि कवी मंगेश जनबंधू व इतर पदाधिकाऱ्यांनी जाहिर केले.या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती अशोक भैया करणार असून कवी डॉ नोमेश मेश्रामांची उपस्थिती राहणार आहे.याप्रसंगी कार्य. प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर सत्राचे अध्यक्षस्थान भूषवतील.

    

कवी डॉ.खानोरकरांचे पाच काव्यसंग्रह,दोन संपादित ग्रंथ आणि झाडी लोककलांवरचा लोकप्रिय ' संजोरी ' ललितबंध प्रकाशित असून दोन ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या निवडीबद्दल अनेक कविंनी,पत्रकारांनी,मित्र - मंडळींनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !