नागपुरातील बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सही प्रकरण. 📍चामोर्शी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के निलंबित.

नागपुरातील बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सही प्रकरण.


📍चामोर्शी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के निलंबित.


एस.के.24 तास


चामोर्शी : नागपुरातील बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सही करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांच्या निलंबनाचा आदेश शासनाने काढला आहे.


गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांनी त्यांना निलंबित केल्याची माहिती दिली आहे.नागपुरातील एका बार आणि रेस्टॉरंटमधील टेबलवर महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेल्या फाईल ठेवून एक अधिकारी दारू ढोसत होता.


त्याच्या एक व्हिडीओ व्हायरल झाला.या प्रकरणात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले.या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान तो अधिकारी चामोर्शी येथे उपविभागीय अभियंता पदावर कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर त्याच्या निलंबनाच्या आदेशाचे शासनाचे पत्र गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !