आई सोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा नदीत बुडून आई समोरच मृत्यु.
एस.के.24 तास
सिंदेवाही : तालुक्यातील बोकडोह नदीवर आपल्या आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षीय मुलाचा नदीत बुडून आई समोरच मृत्यु झाल्याची घटना आज दि. ६ ऑगस्टला सकाळी ९. वाजताच्या सुमारास घडली.लोकेश उर्फ समीर मोहन वरखडवार (१२) रा. खातगाव असे मृतक बालकाचे नाव आहे.