विदर्भातील लोक कलावंतांचा राष्ट्रीय कीर्तिमान ; " नालंदा लोककला मंचच्या कलावंतांची यशोकीर्ती "

विदर्भातील लोक कलावंतांचा राष्ट्रीय कीर्तिमान ; " नालंदा लोककला मंचच्या कलावंतांची यशोकीर्ती "

एस.के.24 तास


‎गडचिरोली : दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र तंजावर,सांस्कृतिक मंत्रालय ,भारत सरकार च्या माध्यमातून भारताचे केंद्रशासित प्रदेश असलेली पांडेचेरी या ठिकाणी दिनांक 15 ऑगस्ट 2025 ते 17 ऑगस्ट 2025 या तारखेला राष्ट्रीय स्तरावरील " Fete _De_पंडिचेरी " या सांस्कृतिक  महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजन दिनांक 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत करण्यात आले होते, यात देशातील 19 राज्यांच्या लोक कलावंतांनी आपापल्या लोककला सादर केल्या. 


या प्रसंगी मान.एन.रंगस्वामी (मुख्यमंत्री पांडेचेरी),मान.के. कैलासनाथन (राज्यपाल पांडेचेरी) तसेच मान. श्री पी.आर.एन.तिरुमुरुगन (कला व संस्कृती मंत्रालय) यांच्या उपस्थितीत 15 ऑगस्ट रोजी सकाळी सर्व कलावंतांची परेड करून सायंकाळी  रीतसर महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. 15 अगस्त रोजी सायंकाळी उल्लेखित पाहुण्यांसमोर प्रादेशिक लोक नृत्याचे सादरीकरण करून,सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .

‎ 

"आम्ही लोक कलावंत पुढे चालवू,

‎  लोककलेचा वारसा......

‎ आमची लोक कलाच आहे

‎ खऱ्या लोक संस्कृतीचा आरसा..."


नालंदा लोककला मंचचे मार्गदर्शक, संचालक तसेच गुरु शिष्य परंपरेला जोपासणारे गुरु श्री सुशील खांडेकर यांच्या काव्यपंक्ती खरोखरच लोककलेला जबाबदार नेतृत्वाची गरज आहे ,याची जाणीव करून देतात.आपली मातृभूमी ही विविध कला गुणांनी नटलेली आहे.  


या वैभवाचे खरे मानकरी ठरतात ते म्हणजे या मातीशी जुळलेले कलावंत.मान.श्री सुशील खांडेकर हे ग्राम दवडीपार जिल्हा भंडारा येथिल रहिवासी आहेत .  नालंदा लोक कला मंच च्या माध्यमातून, भंडारा, गडचिरोली चंद्रपूर, गोंदिया ,यवतमाळ, नागपूर सारख्या तळागाळातील कलावंतांना एकत्रित करून त्या कलावंतांना राष्ट्रीय स्तरावर कला प्रदर्शित करायची संधी उपलब्ध करून देतात.

‎  

दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकारच्या माध्यमातून विदर्भातील कलावंतांनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व केले ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.मान.श्री सुशील खांडेकर (गुरु )नालंदा लोक कलामंच दवडीपार


वंदिश नगराळे,बेबीलता खांडेकर,मेघा करकाडे,उद्देश कामिडवार,खोमेश बोबाटे,योगेश ससंकर,कृष्णाली पोटावी,दिव्या भोयर,रोमा भैसारे,संजय देवरे,महेश वाढई ,सौरभ गेडाम,कल्याणी शेडमाके इत्यादि कलावंतांनी पारंपारिक वाद्यांच्या वापर करून प्राचीन, परंपरागत लावणी लोकनृत्य आणि कोळी लोक नृत्याचे नयनदीपक प्रदर्शन करून 19 राज्यातील लोककलावंता समेत देश विदेशातून आलेल्या परदेशी पर्यटकांची मन जिंकून घेतली.

प्रत्यक्ष पांडिचेरी केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री मान. एन रंगस्वामी, मान.के.कैलानाथन राज्यपाल, मान.पी.आर.एन.तिरुमुरुगन,कला व संस्कृती मंत्रालय भारत सरकार,यांचे समोर असलेल्या भव्य श्रोते वर्गांच्या मनावर छाप ठेवण्यात महाराष्ट्राच्या या होतकरू कलावंतांनी कोणतीच कसर बाकी ठेवली नाही. 


शेवटच्या दिवशी दिनांक 17 ऑगस्ट 25 रोजी कार्यक्रमाची सांगता करते वेळी मान.पी. आर. एन. तीरुमूरुगन ,कला व संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या हस्ते शाल, प्रमाणपत्र व पारंपारिक सन्मान चिन्ह देऊन महाराष्ट्राच्या मातीतील या कलावंतांचे सत्कार करण्यात आले. 

महाराष्ट्राच्या मातीतील या कलावंतांना प्रोत्साहन मिळावं आणि जगाच्या पाठीवर त्यांचं नावलौकिक व्हावे या उदात्त हेतूने डॉक्टर अरुण कुमार डांगे,डॉक्टर आश्लेषा विनायक रोडगे,डॉक्टर सुचिता विनोद घडसिंग,डॉक्टर महेंद्र गणवीर,डॉक्टर मनीष शेंडे,दवडीपार बाजार गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री.राज किरण मेश्राम आणि समस्त ग्रामस्थांनी पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !