कोरची येथे वंचित बहुजन आघाडी ची सभा संपन्न.
एस.के.24 तास
कोरची : दिनांक,26/08/2025 रोज मंगळवार ला कोरची येथे वंचित बहुजन आघाडी गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरची येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सोबत पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी व
नवीन कार्यकर्ते पक्षात समाविष्ट कसे करून घेता येईल, नवीन व जुने कार्यकर्ते एकत्रित येऊन पक्ष संघटन वाढविण्यासाठी आपण जोमाने कामाला लागले पाहिजे.येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे, वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा,प्रज्ञा निमगडे वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथजी दुधे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य हंसराज बढोले,जिल्हा कार्यकारणी सदस्यअशोक जी कराडे,आनंदराव जी राहुल, शालिकरामजी कराडे,अविनाश नंदागवळी,संतोष जी उंदीरवाडे यांची उपस्थिती होती.