धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टीपर्पज सोसायटी,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पांढरकवडा येथे मोफत आरोग्य तपासणी संपन्न.
एस.के.24 तास
चंद्रपूर : धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टीपर्पज सोसायटी,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पांढरकवडा येथे मोफत आरोग्य तपासणी.शिबिराचे आयोजन करण्यात आले.ग्रामीण भागातील नागरिकांना सहज,मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
हा कार्यक्रम धारिवालचे मुख्य महा प्रबंधक श्री देवेश कुमार सर यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला.कार्यक्रमात मा.डॉ.अनिश नायर (मुख्य व्यवस्थापक, धारिवाल),मा.डॉ.रूपेश वैरागडे (धारिवाल) व मा.श्री.सुरज तोतडे (माजी सरपंच पांढरकवडा) यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमात एकूण 104 नागरिकांनी आरोग्य तपासणी करून औषधोपचाराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण मोरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोमल ताडे,मयुरी वादाफळे,कल्याणी डवरे,सुजाता मांदळे,यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिरामुळे गावकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. असे उपक्रम भविष्यातील सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.