एका मिनिटात 1101 फळझाडे लावण्याचा विक्रम- स्मार्ट ग्राम मंगी(बु) यांचा अभिनव उपक्रम.


एका मिनिटात 1101 फळझाडे लावण्याचा विक्रम- स्मार्ट ग्राम मंगी(बु) यांचा अभिनव उपक्रम.


एस.के.24 तास


राजुरा : ग्रामपंचायत मंगी (बु) ही नेहमी प्रमाणे त्यांच्या विविध उपक्रमाकरिता जिल्ह्यात प्रसिद्ध आहे..आज दिनांक २१ ऑगस्ट २०२५ ला स्मार्ट ग्रामपंचायत मंगी (बु), अंबुजा सिमेंट कंपनीच्या CSR उपक्रमांतर्गत अंबुजा फाउंडेशन उपरवाही, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मंगी (बु), शासकीय आश्रम शाळा मंगी(खुर्द),जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगी(खुर्द) व समस्त ग्रामवासी यांच्या लोकसहभागातून आज रोजी २१ ऑगस्ट २०२५ ला,  एका मिनिटात 1101 फळझाडे लावण्याचा विक्रम स्मार्ट ग्राम मंगी (बु.) द्वारा करण्यात आला.


यावेळी राजुरा तहसील चे तहसीलदार आदरणीय डॉ.ओमप्रकाश गौंड साहेब, हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.सोबतच, तालुका कृषीअधिकारी श्री.विनायक पायघन साहेब, अंबुजा येथील मा. श्रीकांत कुंभारे साहेब (झोनल हेड)



मा.प्रमोद खडसे साहेब (प्राचार्य अंबुजा ITI) मा. सुभाष बोबडे सर (उत्तम कापुस,सहाय्यक प्रकल्प अधिकारी) मा.रघुनाथ बबीलवार सर (महिला सक्षमीकरण अधिकारी) राजुरा देशोन्नती चे पत्रकार गणेशजी बेले, गावातील सरपंच आदरणीय श्री.शंकरजी तोडासे, उपसरपंच वासुदेवजी चापले, ग्रामपंचायत सदस्या धृपताताई आत्राम.


सोनालीताई कोडापे, छाया कोटनाके, माजी सरपंच रसिकाताई पेंदोर, माजी सरपंच सोनबतीताई मडावी,तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष परशुरामजी तोडासाम, सिध्देश्वर जंपलवार (लोकेशन इन्चार्ज), प्रदिप डोंगरे सर, स्नेहा गिरडे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य गण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मेंगोराव कोडापे व सदस्य गण...


माजी मुख्याध्यापक श्री.रत्नाकर भेंडे सर,श्री. ऋषी मेश्राम सर ग्रामपंचायत अधिकारी कु.नंदिनी कोरवते ताई, बापुजी पेन्दोर (प्रशेत्र अधिकारी), प्रतिष्ठित नागरिक गणपतजी चापले, दिलीपजी आत्राम, मोतीरामजी पेंदोर, आश्रम शाळा मुख्याध्यापक आनंद शंखदरवार सर, डॉ. किशोर कवठे सर, मारोती चापले सर मु.अ. मंगी (बु.) पंडित पोटावी सर,वनिता तुरारे मॅडम,रजनी गेडाम मॅडम, मु.अ. जीवन लांडे सर मंगी(खुर्द), प्रदीप पावडे सर, सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झालेत.


सदर कार्यक्रम हा एक भविष्यातील वातावरण बदल बाबत सतर्कतेचे उचललेले पाऊल आहे हीच फळझाडे पूढील पिढीला सावली व फळे उपलब्ध करून देतील..जागतिक तापमान वाढी साठी वृक्षारोपण व संगोपन ही काळाची गरज आहे.


स्मार्ट ग्राम मंगी बु. येथे मागील 3 वर्षात जवळपास 25 हजारांच्या वर वृक्ष लागवड करण्यात आलीत व नरेगा च्या 80 च्या वर महिला रोजगार त्यांची देखभाल व संगोपन करीत आहे...सदर उपक्रम हा जिल्ह्यात प्रथमच करण्यात आला गावाची लोकसंख्या 1816 आहे.


मागील महिन्यातच ग्रामविकास मंत्रालयामार्फत लोकमत सरपंच अवॉर्ड ने मंगी बु. येथील सरपंच श्री.शंकरजी तोडासे यांना पर्यावरण या विषयावर जिल्हा व राज्य स्तरीय उत्कृष्ट कामाबद्दल गौरविण्यात आले.


25 लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायत ला मिळणार अशी घोषणा ग्रामविकास विभागाने केली.वृक्षारोपण झाल्यानंतर  सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मसाले भात व जिलेबी चे जेवण देण्यात आले..कार्यक्रमाचे संचालन डॉ.किशोर कवठे सर व आभार सुधीर झाडे सर यांनी केले..कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी सर्वांनी सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !