कळमना येथे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून इको-फ्रेंडली गणेश विसर्जन.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : पर्यावरण वाचले तर संस्कृती आणि संस्कार टिकतील या संकल्पनेला वास्तवात उतरवत जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदर्श ग्राम कळमना येथे यावर्षी गणेशोत्सवानिमित्त इको-फ्रेंडली गणेश विसर्जन करण्यात आले.
कळमना ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या संकल्पनेतून व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत गावात विशेष विसर्जन कुंड उभारण्यात आले.यामध्ये संपूर्ण कळमना ग्रामस्थांनी आपल्या गणरायाचे विसर्जन केले. या उपक्रमामुळे नदी-नाले प्रदूषणापासून वाचले तसेच पर्यावरणपूरक परंपरेला नवे बळ मिळाले.
गावकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गणेशोत्सव हा आनंदाचा सण असून तो पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा झाला, तरच संस्कृती व पर्यावरण दोन्ही जपले जातील असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
या प्रसंगी ग्रामसेवक शुभांगी कवलकर, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष महादेव ताजने, कार्यकर्ते विठ्ठल वाढई,महादेव आबिलकर,दत्ताजी पिपळशेंडे, सतीश आबिलकर, बोढे, मंजुषा आबिलकर,अल्का गेडाम, यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.