चामोर्शी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या सभा संपन्न.
एस.के.24 तास
चामोर्शी : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे यांच्या मार्गदर्शनात दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोज रविवारला पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत चामोर्शी तालुक्यामध्ये गांव बांधनी व लोक संपर्क दौरा सुरू करण्यात आला.
असून तालुक्यातील नवेगाव,मुरखडा,सगणापूर, आंबोली,येणापुर,अनखोडा,आष्टी आदी गांवामध्ये प्रत्यक्षात भेटी देऊन पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सोबत सभा घेऊन येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे,पक्ष बळकटीसाठी जास्तीत जास्त प्रमाणात भर देण्यात यावा असे सुचविण्यात आले.
सभेला वंचित बहुजन आगाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मंगलदास चापले,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष रघुनाथ दुधे,वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ कार्यकर्ते देवानंद जी दुर्गे,वंचित बहुजन आघाडी चामोर्शी तालुका उपाध्यक्ष सुधाकर रामटेके
महिला प्रतिनिधी जया रामटेके,आष्टी सर्कल प्रमुख छोटुभाऊ दुर्गे,ज्येष्ठ कार्यकर्ते झाडे साहेब, भंतेशजी निमसरकर, आदी कार्यकर्ते उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या विचारांशी देवान घेवान करून गांव बांधनीसाठी व पक्ष बळकटीसाठी सर्वांनी एकत्रित येऊन जोमाने प्रयत्न केले पाहिजे असे ठरविण्यात आले.