अल्पवयीन मुलीचा विवाह,शरीर संबंधांमुळे झाली गर्भवती अन्.. आई - वडिलांसह सासु सासरेही सामील ; आरोपी यास पोलिसांनी अटक करून ताब्यात.

अल्पवयीन मुलीचा विवाह,शरीर संबंधांमुळे झाली गर्भवती अन्.. आई - वडिलांसह सासु सासरेही सामील ; आरोपी यास पोलिसांनी अटक करून ताब्यात.


एस.के.24 तास


रायगड  : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग तालुक्यात एक अल्पवयीन पीडिता हिच्यावर जबरदस्ती करीत तिला कुमारी माता केलं होते.ही घटना ताजी असताना अलिबाग तालुक्याला लागूनच असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या पेण तालुक्यात असणाऱ्या पेण आणि वडखळ पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना कुमारी माता बनविल्या प्रकरणी पेण आणि वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रायगड जिल्ह्यातील वडखळ पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक 1 नोव्हेंबर 2024 ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान आरोपी याने अल्पवयीन पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या बरोबर प्रेम असल्याचे भासवले.पीडिता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपीने तिच्यासोबत मंदिरात जाऊन विवाह केला.तिच्या अज्ञात पणाचा फायदा घेत अल्पवयीन पीडितेसोबत सोबत शरीरसंबध ठेवत पीडितेस गरोदर केले.


मुलीची प्रसुती होवुन तिने एका मुलीस जन्म दिला आहे. यातील आरोपी यास पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे. याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात 92/2025,भारतीय न्याय संहिता 64(2) आय,एम,बाल लै.अत्या.संरक्षण अधिनियम,2012 चे कलम 6,6, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.असून अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उप निरीक्षक योगिता सांगळे या करत आहेत. तर दुसरी घटना पेण पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, पेण पोलीस ठाणे हद्दीत दिनांक,1 जानेवारी 2021 ते दि,31 ऑगस्ट 2025 दरम्यान येथे पीडीत बालिका सन 2021 मध्ये अल्पवयीन होती.हे तिचे आई वडील, आणि सासू यांना माहिती होती.तरी त्यांनी अल्पवयीन पीडितेचे अल्पवयीन विधीसंघर्षीत बालकासोबत समाजातील रीतीरिवाजा प्रमाणे लग्न लावुन दिले. 


त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याने ती गर्भवती राहिली.पीडितेचा पती पती (विधीसंघर्षीत बालक) याचे पासुन गरोदर राहुन एक मुलीला जन्म दिला. याबाबत पेण पोलीस ठाणे गुरनं.166/2025, बाल लै. अत्या.संरक्षण (अधिनियम,2012 चे कलम 4,6,8, भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 64 (2)(आय),(एम),3(5) बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम १०प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सोमनाथ घोलप हे करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !