गडचिरोली डिव्हीजनमध्ये सहा वर्षांपासून सक्रीय असलेल्या माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने अत्यंत शिताफिने हैद्राबाद (तेलंगना) येथुन केली अटक.
📍महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 02 लाख रुपयांचे बक्षीस.
एस.के.24 तास
गडचिरोली : (दिनांक,07/09/2025) गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. येथे माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात.
माओवाद्यांच्या सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवाह्रांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या माओवाद्यांस दिनांक 04/09/2025 रोजी गडचिरोली पोलीस दलाने अटक केली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 108 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलातील सपोनि. प्रशांत बोरसे व सी-60 पथक यांच्या नेतृत्वात जवानांनी गोपनियरित्या अभियान राबवून जहाल माओवादी नामे शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा वय,25 वर्ष,रा.बांदेपारा ता.भोपालपट्टनम जि. बिजापूर (छ.ग.) यास हैद्राबाद येथून दिनांक 04/09/2025 रोजी ताब्यात घेतले.
त्यानंतर त्याची अधिक सखोल चौकशी केली असता, माहे नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा कापेवंचा येथे झालेल्या रामजी चिन्ना आत्राम या निरपराध इसमाच्या हत्येमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला पोस्टे अहेरी येथे त्या अनुषंगाने दाखल अप क्र. 0411/2023 कलम 302, 147, 148, 149, 120 (ब) भादवि सह कलम 3,27 भाहका अन्वये गुन्ह्रात अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनूसार जहाल माओवादी नामे शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा हा सप्टेंबर 2018 मध्ये छत्तीसगड येथील नॅशनल पार्क एरीयामधील मद्देड दलममध्ये भरती झाला होता व त्याने गडचिरोली येथील पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर काम केले. मर्दिनटोला, पैडी इ. सारख्या चकमकींमध्ये अनेक माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश प्राप्त झाले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या तीव्र अभियानामूळे त्याच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाल्यामूळे पेरमिली दलम संपूष्टात येण्यापूर्वी तो सन 2024 मध्ये दलम सोडून घरी परत आला होता. घरी 7 ते 8 महिणे शेतीची कामे केल्यानंतर आंध्रप्रदेश येथील एंटापूर व त्यानंतर हैद्राबाद येथे राहून काम करुन आपला उदनिर्वाह करीत होता.
शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा हा सध्या हैद्राबाद येथे वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन गडचिरोली पोलीस दलाने खून, चकमक अशा देशविघातक कृत्य करणाया या जहाल माओवाद्यावर गोपनियरित्या पाळत ठेवून दिनांक 04/09/2025 रोजी हैद्राबाद येथुन त्याला अटक केली आहे. सदर माओवाद्यास मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास चार दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे.
अटक माओवाद्याचा दलममधील कार्यकाळ : -
1) माहे सप्टेबर 2018 मध्ये नॅशनल पार्क एरीया मधील मद्देड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे डिसेंबर 2018 पर्यंत काम केले.
2) माहे डिसेंबर 2018 मध्ये गडचिरोली डिव्हीजनमध्ये बदली होऊन डिव्हीसीएम शंकरअण्णा ऊर्फ असाम ऊर्फ शिवा ऊर्फ शिवय्या यांचे अंगरक्षक म्हणून सन 2022 पर्यंत काम केले.
3) सन 2022 मध्ये पेरमिली दलममध्ये बदली होऊन सन 2024 पर्यंत सदस्य पदावर काम केले.
कार्यकाळात केलेले गुन्हे : -
चकमक - 04
📍 सन 2020 मध्ये मौजा येडदर्मी जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता.
📍सन 2021 मध्ये मौजा मडवेली जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता.
📍सन 2023 मध्ये मौजा वेडमपल्ली जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता.
📍सन 2024 मध्ये मौजा चितवेली जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता.
खून - 01
📍माहे नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा मौजा कापेवंचा येथील एका निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
शासनाने जाहिर केलेले बक्षीस.
1) महाराष्ट्र शासनाने शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा याच्या अटकेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री.संदिप पाटील,पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री.अंकित गोयल, पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री.नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक,अहेरी (प्राणहिता) श्री.सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री.विशाल नागरगोजे यांचे मार्गदर्शनाखाली
तांत्रिक इंटेलिजन्स शाखेचे सपोनि. प्रशांत बोरसे, पोउपनि. अक्षय लव्हाळे, पोउपनि. पवन जगदाळे, पोहवा/संतोश नरोटे, पोअं/राहूल दुर्गे तसेच विशेष अभियान पथकाच्या जवानांनी पार पाडली. तसेच पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.