बहुजनाय वनविभाग अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने कार्यशाळा संपन्न.
📍 समस्यांवर समाधान " कार्यशाळा,चर्चासत्र,मार्गदर्शन उपक्रमांतर्गत " जगाला हेवा वाटेल,असा महाराष्ट्र वन विभाग घडविण्याचा संकल्प "
एस.के.24 तास
देवरी : दि.31 ऑगस्ट 2025 " बहुजनाय वनविभाग अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य " च्या वतीने दि. 31 ऑगस्ट 2025, रविवार रोजी सकाळी 11:00 वाजता स्थानिक देवरी येथील कुणबी समाज भवन येथे " समस्यांवर समाधान " या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश " जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र वन विभाग घडविण्याचा संकल्प "
कार्यक्रमाची सुरुवात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि शाहू महाराज, महात्मा फुले, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्षपद संघटनेचे विधी सल्लागार देवकिशोर गडपांडे यांनी भूषविले.
त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भारत हा लोकशाही प्रधान देश असून, भारतीय संविधानाने आपल्या हक्कांच्या अस्तित्वाची लढाई लढण्याचा अधिकार दिला आहे.त्यांनी संघटनेचे महत्त्व देखील विषद केले.
संघटनेचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्र वन विभाग हा शासनाला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग आहे. राज्याच्या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी तो एक महत्त्वपूर्ण घटक आहे. तरीही, गेल्या काही वर्षांपासून वन विभागात गैरव्यवस्थापनाच्या घटना समोर येत आहेत, ज्यामुळे विभागाच्या प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम होत आहे.
प्रदेश कार्याध्यक्ष सचिन गायकवाड भारतीय यांनी सांगितले कि, ही संघटना महाराष्ट्र राज्यातील वन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हक्कांसाठी काम करत असून, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील, तसेच, बारमाही, हंगामी आणि कंत्राटी कामगार यांच्यासह इतर पदांवरील कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर समाधान आणि त्याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी सर्वांना संघटनेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात संघटनेतील इतर पदाधिकाऱ्यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून देवकिशोर गडपांडे, सचिन गायकवाड भारतीय कार्याध्यक्ष, जगदीश बलोदे प्रदेश कोषाध्यक्ष, रमेश सोनुले प्रदेश मुख्य संघटक व नागपूर वनवृत्त अध्यक्ष, कु. राजश्री पद्मगिरवार महिला वृत्त अध्यक्षा, सुधीर कुंभरे वनवृत्त उपाध्यक्ष व विभागीय अध्यक्ष भंडारा (अतिरिक्त)
शिवचरण बारसे अध्यक्ष गोंदिया विभाग,के.झेड.बिजेवार उपाध्यक्ष गोंदिया विभाग,संजय परसगाये वृत्त अध्यक्ष अस्थाई वनमजूर, आणि मंगेश फुंडे वृत्त उपाध्यक्ष तसेच मंगेश कुंभरे,नरेश भोयर,प्रुथ्विराज राऊत ,गोविंदा राऊत सह गोंदिया विभाग मधील अस्थाई वन कामगार, कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश सोनुले यांनी केले आणि आभार सुधीर कुंभरे यांनी मानले. कार्यक्रमानंतर अल्पोपहाराने सांगता झाली.