पोलीस भरती ऑक्टोबर पासून,अर्ज प्रक्रिया संदर्भात महत्त्वाची अपडेट.
एस.के.24 तास
नागपूर : राज्य पोलीस दलात १५ हजार शिपायांची भरती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.२०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबरोबरच २०२२ व २०२३
मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळ विशेष बाब म्हणून अर्ज करुन भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी देण्यास मंजुरी देण्यात आली. राज्यात होणाऱ्या या मोठ्या पोलीस पण भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.
उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करावा लागणार असून एकाच पदासाठी उमेदवार एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज करू शकणार नाही. एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज केले असतील तर एकच अर्ज पात्र ठरेल. राज्यातील गृह विभागाकडील दहा हजार १८४ पोलिसांची (पोलीस शिपाई, चालक शिपाई) पदे रिक्त आहेत.
याशिवाय बेंड्समन, राज्य राखीव पोलीस बल अशीही दीड हजारांपर्यंत पदे रिक्त आहेत. प्रशिक्षण व खास पथकांच्या विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने रिक्त पदांची माहिती गृह विभागाला दिल्यानंतर मंजुरी मिळून पदभरतीला सुरुवात होणार आहे.