कळमना येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जल्लोषात साजरा ; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात तर आदर्श कार्यकर्त्यांना कळमना भूषण पुरस्कार.


कळमना येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन जल्लोषात साजरा ; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची सुरुवात तर आदर्श कार्यकर्त्यांना कळमना भूषण पुरस्कार. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


राजुरा : आदर्श जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून ख्याती असलेल्या कळमना येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ रिजेवाड साहेब, गटविकास अधिकारी पंचायत समिती राजुरा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई होते. 


प्रमुख पाहुण्यांमध्ये विस्तार अधिकारी ,शेंडे साहेब, मेश्राम साहेब, ग्रा.प.सदस्य तथा शा. व्य. स. अध्यक्ष सौ. रंजना दिवाकर पिगे, पोलीस पाटील बाळकृष्ण पाटील पिंगे, महादेव ताजने (ध्वजारोहण मानकरी व अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ), ग्रामसेविका शुभांगी कवलकर, ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे, सुनीता ऋषी उमाटे, मुख्याध्यापक बेबीनंदा पुणेकर, श्रावण गेडाम, देवराव वांढरे, श्रीकांत कुकुडे, तसेच मान्यवर शिक्षक उपस्थित होते.

        


या सोहळ्यात चार कार्यकर्त्यांना “कळमना भूषण पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. यामध्ये बाळकृष्ण पाटील पिंगे (आदर्श पोलीस पाटील), सामाजिक कार्यकर्ते देवराव पाटील वाढरे व श्रीकांत कुकुडे तसेच उत्कृष्ट विद्यार्थी यश ज्ञानेश्वर ताजने यांचा समावेश होता. पुरस्कार म्हणून मानपत्र,शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देण्यात आले.

   

यावेळी श्री.रिजेवाड साहेबांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आता राज्य स्तरावर देखील प्रथम क्रमांक मिळवण्याचे लक्ष्य ठेवून कळमना येथील गावकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. हुशार व होतकरू सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या नेतृत्वात हे गाव नक्कीच महाराष्ट्रात प्राविण्य मिळवेल.तर सरपंच नंदकिशोर वाढई यांनीही आपल्या मनोगतात नमूद केले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गाव राज्यात प्रथम क्रमांक पटकावेल, यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य आणि प्रशासनाचे मार्गदर्शन कायम राहील.”

      

या प्रसंगी डॉ. लटारी बल्की, कवडु पिंगे, नत्थु वडसकर, रमेश आत्राम, शंकर गेडाम, पुंडलिक मेश्राम, संगीता उमाटे, लता क्षिरसागर, सपना मेश्राम यांच्यासह समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !