प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अपंग हृदयसम्राट बच्चुभाऊ कडू यांच्या वतीने दिव्यांग शेतकरी संजय डवले यांचा भव्य सत्कार.
📍पोलीस प्रशासन, पत्रकार आणि मिडिया मोठ्या संख्येने उपस्थित.
एस.के.24 तास
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे ११ सप्टेंबर २०२५ रोजी दिव्यांग शेतकरी संजय डवले यांचा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व अपंग हृदय सम्राट बच्चुभाऊ कडू यांनी भावपूर्ण सत्कार केला.या कार्यक्रमाला स्थानिक पोलीस प्रशासनाचे अधिकारी,पत्रकार आणि मीडिया प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे कार्यक्रमाला अधिक औपचारिकता आणि सामाजिक महत्त्व लाभले.
कार्यक्रमात विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते, जे दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर आणि समाजाच्या वेगवेगळ्या घटकांच्या न्यायासाठी एकत्र आले होते. सत्कारादरम्यान समाजातील महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली.
ज्यामुळे दिव्यांग व शेतकरी समाजातील लोकांना बळकटी आणि नवीन उर्जा मिळाली.अशा प्रकारच्या सहकार्यामुळे समाजसेवेतील उपक्रम यशस्वी होतात, असे सर्वांनी मान्य केले.