शासकीय तंत्रनिकेतन, ब्रह्मपुरी येथे सायबर क्राईम अवरनेस विषयी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१६/१०/२५ पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी च्या वतीने पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, उपनिरीक्षक श्रीनाथ गिराम,हवालदार अरुण पिसे,अंमलदार देवेंद्र लोणबले यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरी येथे सायबर गुन्हे अवेरनेस गुन्हाविषयी,सायबर गुन्हा या विषयी विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले व हवालदार अरुण पिसे यांनी मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शनाच्या वेळी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य वानखेडे , प्राध्यापक आणि जवळपास १५० विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाला उपस्थित उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.