चिमूर तालुक्यात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार.
📍जानेवारी पासून आतापर्यंत ३७ नागरिक ठरले वन्यजीवांचे बळी.
एस.के.24 तास
चिमुर : चिमूर तालुक्यातील मौजा शिवरा येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात शेतकरी निलकंठ त्र्यंबक भुरे (६०) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी चार ते पाच वाजताच्या सुमारास घडली.शेतकरी निलकंठ भुरे हे दुपारी आपल्या शेतात गेले होते.ते सायंकाळपर्यंत घरी न आल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शेतात शोध घेतला असता, वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठले व मृतदेह पंचनामा करून चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
या परिसरात गेल्या १५ दिवसांत वाघाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.या परिसरात गेल्या १५ दिवसांत वाघाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.संतप्त ग्रामस्थांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली असून, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला वनविभागात नोकरी देण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न केल्यास दोन दिवसांत रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा गावातील सरपंच आणि नागरिकांनी दिला आहे.
जानेवारी पासून आतापर्यंत ३७ नागरिक ठरले वन्यजीवांचे बळी : -
चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीवांच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. वनविभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारीपासून आतापर्यंत ३७ नागरिक वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले असून, त्यापैकी ३३ जणांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाला आहे. तसेच दोन तेंदूए, एक भालू आणि एका हत्तीच्या हल्ल्यातही नागरिकांचा बळी गेला आहे.
दरम्यान, सध्या जिल्ह्यात खरीप हंगामातील पीककापणीचे काम सुरू असून, सतत वाढणाऱ्या वाघांच्या हालचालींमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. नागरिकांनी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

