सौ.टिना राज ठाकरे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत.

 


सौ.टिना राज ठाकरे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत.


राजेंद्र वाढई : उपसंपादक


मुल : २०१६ मध्ये झालेल्या निवडणूकीनंतर नियमानुसार २०२१ मध्ये निवडणूक व्हायला पाहीजे होती . मात्र तब्बल चार वर्षाच्या विलंबनानंतर यंदा २०२५ मध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला . आणी पुढ्च्या महिण्यात निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याचे निश्चित केले.त्यामूळे सर्वच पक्ष कामाला लागले.


मुल नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे मागास प्रवर्ग ( महिला) साठी राखीव असल्याने जे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी बांशिग बाधून तयार होते त्यांच्यात आज नाराजीचा सूर गवसला. तरी पण ते आपआपल्या अर्धांगिनी ला नगराध्यक्ष पदासाठी रणांगणात उतरण्याची तयारी दर्शवून नशिब आजमवणार आहेत.

          

भाजपा कडून माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर,उषाताई शेडे , महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा मनिषा गांडलेवार , माजी सभापती महेन्द्र करकाडे यांच्या अर्धागीणी माधूरी करकाडे, माजी सभापती विद्याताई बोबाटे, माजी नगरसेविका रेखाताई येरणे,माजी शहर अध्यक्ष अर्चना चावरे, शहर अध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांचे अर्धांगिणी चेतना मोहुर्ले , प्रा . किरण कापगते , इंजि शिवानी आगडे , ॲड. जयश्री राकेश ठाकरे,आणी मनिषा प्रशांत लाडवे . या सर्वांनी उमेदवारीसाठी तयारी दर्शविली आहे. 


तसेच सौ टिना राज ठाकरे ह्या सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी शर्यतीत आहेत.


सौ टिना राज ठाकरे वरोरा येथील यांच्या माहेरकडील राजकारणी घराण्याचा अनुभव तसेच राज ठाकरे हे सुद्धा राजकारणी घराण्याचे असल्याने ते सुशिक्षीत आहेत त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे.त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी आपले नशिब आजमवणार आहेत.सौ. टिना राज ठाकरे या नगराध्यक्ष पदासाठी शर्यतीस उतरणार असी मुल शहारात जोरदार चर्चा सुरू आहे .

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !