अरण्यवास बुद्ध विहार,नाला संगम कोठरी येथे जाणारा रस्ता पर्यटन विकास निधीतून डांबरीकरण अथवा सिमेंट रस्ता करण्यात यावे.
📍बुद्ध विहार कोठरी येथील सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध. - डॉ.प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.
एस.के.24 तास
चामोर्शी : दिनांक 29ऑक्टोंबर 2025 गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील चामोर्शी तालुक्यातील बुद्ध विहार नालासंगम कोठरी येथे दरवर्षी वर्षावास समापन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येते या निमित्ताने या ठिकाणी भव्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात येतात दरवर्षी देशभरातील विविध राज्यातील भन्ते जी व उपासक उपासक यांचे आगमन या ठिकाणी होते.या ठिकाणी बौद्ध विहार कोठरीच्या वतीने येथील प्रमुख भन्ते भगीरथ यांच्या हस्ते विविध कार्यक्रमाचे आयोजन खूप मोठं स्तरावर होत असतात.
येथे आलेल्या समस्त उपासक,उपासिका यांचे सर्व सोयी व सुविधा बुद्ध विहाराच्या वतीने करण्यात येते व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असलेला हा बुद्ध विहार आहे या बुद्ध विहारात जाण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने साधारण खडीकरण व मुरुमाची टाकलेला रस्ता तयार करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पाऊस आल्यानंतर संपूर्ण रस्ता चिखलमय होतो व आलेल्या भन्तेजी व उपासक उपासिकांना खूप मोठा त्रासाचा सामना करावा लागतो.
तरी या ठिकाणी राज्य सरकारच्या पर्यटन विकास निधीतून येथील रस्ता डांबरीकरण अथवा सिमेंट करण करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणय खुणे. यांनी या ठिकाणी भेट देऊन प्रसिद्धी माध्यमातून सदर मागणी केली व यावेळी प्रामुख्याने येथील भंते भगीरथ स्वतः उपस्थित होते त्यांनी सुद्धा सदर मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महिला आघाडी अध्यक्ष मनीषाताई मडावी.राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी.आयु प्रवीण भाऊ मुंजुमकर.विनोद किरमे. शुभंकर चक्रवर्ती. व एकनाथ भाऊ भुरसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


