माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ; ३८ वर्षांनंतर आले एकत्र ; माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा.

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ; ३८ वर्षांनंतर आले एकत्र ; माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,१३/१०/२५ ब्रम्हपुरी येथील नेवाजाबाई हितकारिणी विद्यालयातील १९८७ सालच्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल ३८ वर्षानंतर स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला देश विदेशातून तब्बल 35 विद्यार्थी जमले होते. यापैकी बरेच विद्यार्थी आज खाजगी कंपन्यांमध्ये उच्च पदावर आहेत,कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी C.A., काही विद्यार्थी स्वतःच्या व्यवसायात यशस्वी झाले आहेत, काही जण शिक्षकी पेशा स्वीकारून विद्यार्थी घडविण्याचे सत्कार्य करीत आहेत.


त्यातले काही मातीतून मोती पिकविणारे पोशिंदे बनले आहेत. सर्वच विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशस्वी भवितव्यामध्ये माजी शिक्षकांचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. माजी मुख्याध्यापक मराठे सर , राम दोनाडकर सर , गोडे सर, सुखदेवजी प्रधान सर, ऋषी जी राऊत सर, मिसार सर आणि ग्रंथपाल देवराव ठेंगरी आदींची उपस्थिती होती. 


सर्व विद्यार्थी यांनी शिक्षकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. माजी शिक्षक सुखदेव प्रधान सर यांनी सुखी जीवनासाठी वेळ काढून गेट-टुगेदर व्हायलाच पाहिजे, असे मत व्यक्त केले.तसेच व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्यांनी अडचणीचा सामना करत न डगमगता त्यावर मात करत समोर जावे असे आवाहन केले त्यानंतर इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले.


विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन एजाज हक यांनी तर नियोजन व आभार प्रदर्शन परेश करंडे आणि प्रशांत गावतुरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी माजी विद्यार्थ्यांनी विशेष परीश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !