राजकीय वरदहस्त आणि नियमांना केराची टोपली दाखवून अहेरीत उभी राहिलेली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अनधिकृत इमारत अखेर अहेरी नगरपंचायतीने केली जमीनदोस्त.

राजकीय वरदहस्त आणि नियमांना केराची टोपली दाखवून अहेरीत उभी राहिलेली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अनधिकृत इमारत अखेर अहेरी नगरपंचायतीने केली जमीनदोस्त.


एस.के.24 तास


अहेरी : राजकीय वरदहस्त आणि नियमांना केराची टोपली दाखवून अहेरीत उभी राहिलेली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अनधिकृत इमारत अखेर अहेरी नगरपंचायतीने जमीनदोस्त केली आहे.न्यायालयीन प्रक्रियेनंतर मिळालेली मुदत संपताच प्रशासनाने आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही धडक कारवाई केली.


नेमके प्रकरण काय ?

गडअहेरी मार्गावर अजय कंकडालवार यांनी भूखंड खरेदी करून त्यावर इमारत बांधकामासाठी परवानगी मागितली होती. नियमानुसार राज्य महामार्गापासून आवश्यक असलेले 20 मीटर किंवा रस्त्याच्या हद्दीपासून 4.50 मीटर अंतर सोडण्यास त्यांनी नकार दिला होता.नगरपंचायतीने परवानगी नाकारूनही कंकडालवार यांनी बांधकाम सुरूच ठेवल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले होते.


कारवाईचा घटनाक्रम : - 


परवानगी नाकारली : - नियमांचे उल्लंघन होत असल्याने नगरपंचायतीने सुरुवातीलाच बांधकाम नकाशा नाकारला होता.


राजकीय वळण : - विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी आणि स्थानिक नाराजीमुळे या प्रकरणाला राजकीय धार चढली. विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने प्रशासकीय चक्रे वेगाने फिरली.


न्यायालयीन लढा : - नगरपंचायतीने बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्यानंतर कंकडालवार यांनी न्यायालयात धाव घेतली होती.२९ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला.


मुदत संपली : - वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यासाठी दिलेली मुदत संपूनही कोणतीही स्थगिती न मिळाल्याने आज नगरपंचायतीने थेट " बुलडोझर "  चालवला.


महत्त्वाची बाब : - नगरपंचायतीने यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते नियमावलीची स्पष्ट माहिती घेतली होती. वारंवार नोटीस देऊन आणि पोलीस तक्रार करूनही बांधकाम न थांबवल्याने अखेर ही टोकाची कारवाई करण्यात आली.


प्रशासनाचा कडक इशाराया कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अहेरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. “नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अनधिकृत बांधकामावर अशीच कारवाई केली जाईल,” असा संदेश या निमित्ताने नगर पंचायत प्रशासनाने दिला आहे

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !