राजकीय,नाटयक्षेत्रातील व्यक्तीची प्रगतशिल शेतकरी म्हणून विदेश कृषी अभ्यास दौऱ्यासाठी निवड.? कृषी विभागाचा अजब कारभार.
📍कॉंग्रेसचे कुणाल पेंदोरकर यांनी घेतला आक्षेप ; जिल्हा कृषी अधिकाऱ्यावर केली कारवाईची मागणी.
एस.के.24 तास
गडचिरोली : कृषी विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्हयातील प्रगतशिल शेतकरी म्हणून 5 व्यक्तींची विदेश दौयासाठी निवड करण्यात आली आहे.या 5 शेतकर्यांच्या निवडीवर कॉंग्रेसच्या असंघटीत कर्मचारी कमागार आघाडीचे जिल्हाध्यक्ष,कुणाल पेंदोरकर यांनी आक्षेप घेतला आहे.
सदर शेतकऱ्यांची निवड कोणत्या निकषाच्या आधारावर करण्यात आली आहे याबाबत पेंदोरकर यांनी प्रशासनाला जाब विचारला असून चुकीच्या पध्दतीने शेतकर्यांची निवड करणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पेंदोरकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की,कृषी विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यातील पाच प्रगतशील शेतकऱ्यांची विदेश अभ्यास दौर्यासाठी निवड करण्यात आली आहे. हि निवड पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली असून पालकमंत्री, सहपालकमंत्री यांना सुद्धा अंधारात ठेऊन हि निवड प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे अशी शंका उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील प्रगतशील कोणत्याही शेतकऱ्याचं या यादीत नाव नाही . एका राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीच नाव आणि राजकीय व्यक्तीचे नाव प्रगतशील शेतकरी म्हणून नियुक्त केलेले आहे हे शंकास्पद आहे . या संपूर्ण निवड प्रक्रियेची चौकशी करून जिल्ह्यातील प्रमुख प्रगतशील शेतकऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे
विदेश कृषी अभ्यास दौर्याचा उद्देश परदेशातील प्रगत शेती तंत्रज्ञान, जलसंधारण प्रणाली, सेंद्रिय शेती, तसेच कृषी उत्पादनांच्या मूल्यवर्धनाविषयी प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे हा आहे. याचा फायदा स्वयंघोषित शेतकऱ्यांना न होता जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना झाला पाहिजे ही अभ्यास सहल युरोप, इस्राईल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या देशांमध्ये होणार असून, शेतकरी प्रतिनिधी मंडळ त्या देशांतील अत्याधुनिक सिंचन तंत्र, हरितगृह शेती, आधुनिक यंत्रसामग्रीचा
वापर आणि कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहे त्यामुळे गडचिरोली जिल्हा हा आदिवासी अतिदुर्गम जिल्हा असून यात एकही आदिवासी शेतकऱ्याचे नाव नाही सामान्य व गरीब शेतकऱ्यांचे नाव नाही हे शोकांतिका आहे .
या निवड प्रक्रियेसाठी कृषी विभागामार्फत जिल्हास्तरावर अर्ज मागविण्यात आले होते. त्या सर्व अर्जाची पूणर पडताळणी करण्यात यावी. प्राप्त अर्जांपैकी प्रगत शेती करणाऱ्या, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या आणि उत्पादनवाढ व गुणवत्ता सुधारणा साधणाऱ्या शेतकऱ्यांची निवड निश्चित निकषांनुसार करण्यात आली असेल तर या पाच शेतकऱ्यांच्या अनुभव काय आहे त्यांनी किती कृषी मेळाव्यात सहभाग घेतला आहे या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी.
“ गडचिरोली हा शेतीच्या दृष्टीने आव्हानात्मक जिल्हा असला तरी येथील शेतकऱ्यांनी नवकल्पकतेच्या माध्यमातून उत्तम प्रगती साधली आहे त्यामुळे हि संपूर्ण प्रक्रिया रद्द करून योग्य आणि निवडसमितीने निवड केलेल्ल्याच शेतकऱ्यांनाच या विदेश दौर्याचा लाभ झाल पाहिजे.
सर्व निवड प्रक्रिया रद्द करून नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात यावी व सामान्य उत्कृष्ट शेतकऱ्यांना डावलणाऱ्या जिल्हा कृषी अधीक्षक प्रीती हिरळकर यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी कॉंग्रेसच्या असंघटीत कर्मचारी कमागार आघाडीचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी केली आहे.
अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुध्दा पेंदोरकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे

