4 वाघ जेरबंद सावली वनपरिक्षेत्रातील कार्यवाही.

4 वाघ जेरबंद सावली  वनपरिक्षेत्रातील कार्यवाही.


एस.के.24 तास


सावली : दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपक्षेत्र व उमरी नियतक्षेत्रात असलेल्या मौजा डोनाडा व गवारला येथील जंगलात मागील एक वर्षापासून F - 4 वाघीण व 18 ते 20 महिने वयाच्या तिच्या तीन बछड्यांचा धुमाकुळ सुरू होता. 


सध्या तालुक्यात धान कापणीचे हंगाम सुरु असून सदरचे वाघांना पकडण्यासाठी दिवसेंदिवस गावकऱ्यांची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार वन विभागाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार जेरबंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, त्यास राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांचेकडून दिनांक २४.१०.२०२५ रोजी परवानगी देण्यात आली. त्यास अनुसरून दिनांक 9 नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी 2 वाघ (बछडे) व दिनांक 10 नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी 2 वाघ (बछडा व आई) असे एकूण 4 वाघ जेरबंद करण्यात आले.


सदरची कारवाई श्री. रामानुजम आर. एम. (भा. व. से.) यांच्या मार्गदर्शनात, श्री. राजन तलमले, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर व श्री. विकास तरसे, सहायक वनसंरक्षक यांचे नेतृत्वात श्री. विनोद धुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी सावली, श्री. दत्ता जाधव, परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी व त्यांच्या चमूने यशस्वीरित्या पार पाडली. 


सदर मोहिमेकरीता श्री. घनश्याम नायगमकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, चंद्रपूर, डॉ. कुंदन पोडचेलवार, पशुधन विकास अधिकारी, TTC चंद्रपूर, श्री. अक्षय नारनवरे, जीवशास्त्रज्ञ, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर, RRU टीम चंद्रपूर वनविभाग चंद्रपूर, श्री. अनंत राखुंडे क्षेत्र सहाय्यक, व्याहाड, श्री पाटील, श्री मेश्राम, श्री सिडाम


वनरक्षक श्री.महादेव मुंडे,श्री सोनेकर,श्री खुडे,श्री.डांगे,श्री आखाडे, श्री बोनलवार, श्री अहिरकर, श्री इंगळे, श्री कराड, श्री मुरकुटे, श्री नागोसे व श्री बोरकर तसेच PRT चमू डोनाळा,गवारला,हरंबा,उपरी, बीट मदतनीस यांनी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !