दिनांक २७ व २८डिसेंबर २५ रोजी ३३ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे काटली जिल्हा गडचिरोली येथे आयोजन.
📍झाडीबोली साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, प्रसिद्ध कवी,लेखक,पत्रकार तथा भाष्यकार डॉ.धनराज खानोरकर.
अमरदीप लोखंडे : सहसंपादक
ब्रम्हपुरी : झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोली द्वारा आयोजित जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा काटली जिल्हा गडचिरोली येथे दिनांक २७ व २८/ २०२५ रोजी दोन दिवसीय पार पडणाऱ्या ३३ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्याअध्यक्षपदी डॉ.प्राध्या.धनराज खानोरकर मराठी विभाग प्रमुख नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय,ब्रह्मपुरी हे अध्यक्ष राहणार असून उद्घाटक,मान.डॉ.मिलिंद नरोटे आमदार विधानसभा क्षेत्र गडचिरोली,सह उद्घाटक मान,हिम्मतसिंह बेदला रेसिडेंट डायरेक्टर लायन मेटल अँड एनर्जी लिमिटेड,गडचिरोली
प्रमुख पाहुणे मान.प्रंचित सावकार पोरेड्डीवार अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,गडचिरोली,मान.लखनसिंह कटरे ज्येष्ठ साहित्यिक बोरकन्हार,मान.पद्मश्री परशुराम खुणे गुरनोली, मान. हेमकृष्ण कापगते माजी आमदार ,मान. अनिकेत पाटील गटविकास अधिकारी पंचायत समिती गडचिरोली हे राहणार आहेत.
या दोन दिवशीय होणाऱ्या झाडीबोली साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी,पथसंंचालन,पुरस्कार वाटप,मुलाखत,परिसंवाद,झाडी कवी संमेलन या व अन्य कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे.तरी या दोन दिवशीय होणाऱ्या झाडीबोली साहित्य संमेलनाचा आस्वाद रसीक जनतेने घ्यावा असे आवाहन झाडीबोली साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

