अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, पिंपळगाव( भोसले) द्वारा संचालित महाराष्ट्र विद्यालय,पिंपळगाव (भोसले) येथे शिक्षण विभाग पंचायत समिती,ब्रह्मपुरी द्वारा आयोजित ५३ व्या दिनांक २२ते २४ डिसेंबर २५ या तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन तथा शिक्षकाचे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन पार पडले.
तालुक्यातील एकूण ७८ बालवैज्ञानिकांनी एकापेक्षा एक सरस मॉडेल तयार करून प्रदर्शनीत सहभागी झाले.प्रदर्शनीचे उद्घाटन मा.रवींद्र घुबडे गटविकास अधिकारी ब्रह्मपुरी यांचे हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी श्रीमती.विमल नरहरी क-हाडे अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळगाव होत्या.प्रमुख अतिथी श्री सुरेश दुनेदार सरपंच ग्रामपंचायत पिंपळगाव,श्री केशवराव भुते माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्मपुरी, श्री उमाजी कुथे माजी जिल्हा परिषद सदस्य
श्री.राजेश क-हाडे ,श्री प्रशांत क-हाडे ,श्री प्रवीण कऱ्हाडे संस्था सदस्य, मधुकर मेश्राम ,तालुक्यातील खाजगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख तथा गट साधन व्यक्ती ब्रह्मपुरी,प्राथमिक शिक्षक प्रतिनिधी वर्ग सहा ते आठ उपस्थित होते.
प्रदर्शनीच्या उद्घाटनिय कार्यक्रमा प्रसंगी श्री एन. एस. कोकोडे माजी प्राचार्य नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यातून साधनारा भारताचा विकास यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून विकसित आणि आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी वैज्ञानिक म्हणून सहकार्य करावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. या तीन दिवसीय प्रदर्शनीत विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा श्री महाले सर, श्री सचिन क-हाडे सर, श्री सडमाके सर, श्री नाकाडे सर, श्री गावडकर सर यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या.
विज्ञान शिक्षक श्री मेश्राम सर व कुमारी अंशुल राऊत मॅडम यांनी सर्व मॉडेलची नोंदणी करून परीक्षकांनी योग्य परीक्षण केले व प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.बक्षीस वितरण कार्यक्रम मा. माणिक खुणे साहेब माजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी यांचे अध्यक्षतेखाली बक्षीस वितरक मा.कृष्णाभाऊ सहारे माजी
उपाध्यक्ष जिल्हा परिषद ,चंद्रपूर यांचे शुभ हस्ते गुणवंत माधव सेलोकर महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव(भोसले) माध्यमिक विभाग प्रथम क्रमांकाचे व इतर विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण उपस्थित बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार मा. नीना बोबाटे तहसील कार्यालय ब्रह्मपुरी, श्री निखिल लोंढे पोलीस पाटील पिंपळगाव व सर्व सन्माननीय मुख्याध्यापक यांचे हस्ते देण्यात आला.
याप्रसंगी संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक ओमप्रकाश बगमारे यांचा कृती व कार्यशील मुख्याध्यापक म्हणून शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. तसेच विद्यालयातील अन्न शिजविणाऱ्या महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विद्या शेळके गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी , अहवाल वाचन शाळेचे मुख्याध्यापक ओमप्रकाश बगमारे सर यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री.रुपेश पुरी सर व आभार श्री घ्यार सर यांनी व्यक्त केले.विद्यार्थी मंत्रिमंडळ, स्वयंसेवक व सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.


