शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य निर्मिती माध्यमिक गटातून माहेश्वरी सुंदरकर च्या प्रयोगाची जिल्हा विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक २२ते २४ डिसेंबर २५ या तीन दिवशीय झालेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य माध्यमिक गटातून महाराष्ट्र विद्यालय,आवळगांव येथील शिक्षिका माहेश्वरी सुंदरकर यांची गाईचे शेण व कृषी अवशेषापासून बायोमास प्लेट्स निर्मिती या प्रयोगाची जिल्हा विज्ञान प्रदर्शनी साठी निवड करण्यात आली.
प्रयोगाची जिल्हास्तरावर निवड झाल्यामुळे विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व गावातील नागरिकांनी तिचे अभिनंदन केले आणि जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर जाण्यास भरभरून शुभेच्छा दिल्या दिल्या. तसेच विद्यालयातील विद्यार्थिनी जुही झरकर हीने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तिचे सुद्धा विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.


