राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघाची सभा संपन्न.
रोशन बोरकर - सावली
सावली : राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे शनिवार दिनांक 30 मार्च 2024 रोजी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे यांच्या अध्यक्षस्थतेखाली माजी विद्यार्थी संघाची सभा घेण्यात आली. या सभेला महाविद्यालयातील बरेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या वाटचालीत माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये माजी विद्यार्थ्यांचे अनुभव मार्गदर्शक स्वरूपाचे आहेत असे विचार याप्रसंगी प्राचार्य डॉ.अशोक खोब्रागडे यांनी व्यक्त केले. माझी विद्यार्थिनी कुमारी कोमलवार हिने सुद्धा मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी कोणत्या प्रकारे अभ्यास करायला पाहिजे व यश कसे संपादन करावे याविषयी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विनोद बडवाईक यांनी तर संचालन प्रा. देवीलाल वताखरे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे आभार माजी विद्यार्थी पंचशील खोब्रागडे यांनी मानले.