श्री.गुरुदेव हायस्कूल जिबगाव विद्यालयात सेवानिवृत्ती आणि सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न.

श्री.गुरुदेव हायस्कूल जिबगाव विद्यालयात सेवानिवृत्ती आणि सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न.


एस.के.24 तास


सावली : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्याड खुर्द द्वारा संचालित श्री गुरुदेव हायस्कूल जिगाव येथे आज दिनांक 30 मार्च 2024 रोजी वयोमानानुसार विद्यालयातील शिक्षक आदरणीय मा.पृथ्वीराज खुसाबराव डोंगरे सहाय्यक शिक्षक सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने त्यांचा सेवापुर्ती आणि सेवानिवृत्ती सोहळा संपन्न झाला. श्री गुरुदेव विद्यालयाचे मा. डोंगरे सर गेल्या अनेक वर्षापासून पवित्र कार्य करत होते नियमानुसार वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने विद्यालयात भावपूर्ण निरोप देण्यात आला. 


सेवापुर्ती आणि सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून संस्थापक मा.पत्रुजी पाटील चूदरी तर प्रमुख अतिथी म्हणून जिबगाव येथील सरपंच मा.पुरुषोराम पाटील चूदरी,सॊ. मोनिकाताई उंदीरवाडे उपसरपंच मा.राकेशजी गोलेपल्लीवार ग्रा. प. सदस्य तथा पत्रकार,मा.पी.टी निकुरेसर मुख्याध्यापक, मा.नामदेवरावजी कोतपल्लीवार पोलीस पाटील, मा.तुकाराम भोयर संस्थापक, मा.छत्रपती गेडाम व्यवस्थापक जीवन समृद्धी पत संस्था सावली. सौ.इंदिराबाई भोयर माजी उपसरपंच उपस्थित होते.


 सर्वप्रथम अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांनी दीप प्रज्वलन व व्यासपीठा समोरील प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.व्ही बी येलचलवार सरानी केले, त्यानंतर कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय मा.डोंगरे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ. इंदूताई डोंगरे यांचा शाल श्रीफळ आणि साडी देऊन श्री गुरुदेव हायस्कूल जिबगाव,ग्रामपंचायत जिबगाव,आणि जी.स.पत.सावली तर्फे सन्मानित करण्यात आला. 


कार्यक्रम प्रसंगी श्री गुरुदेव विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थ्यांनी सत्कारमूर्ती विषयी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. तसेच व्यासपीठावरील मान्यवरांनी सत्कारमूर्ती आदरणीय मा.डोंगरे सरांच्या पवित्र कार्यांचा परिचय करून देऊन त्यांनी विध्यार्थी घडवीताना घेतलेली मेहनत, त्यांच्यात असलेल्या स्वभावाचा सन्मान करून त्यांना पुढील नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


सेवानिवृती सत्कारमूर्ती  सत्काराला उत्तर देताना आपण ज्या शाळेत काम केले.त्या ज्ञानसदना विषयी समाधान व्यक्त केले आणि केलेल्या सत्कारविषयी आभार व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन मा.उरकुडे सर तर आभार मा.बनसोड सर यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !