व्याहाड खुर्द येथे इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची जणसंवाद बैठक संपन्न. ★ विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती.

व्याहाड खुर्द येथे इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची जणसंवाद बैठक संपन्न.


★ विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती.


एस.के.24 तास


सावली : दिनांक :- ०२ मार्च २०२४ व्याहाड खुर्द येथे सावली तालुका काँग्रेस कमिटी व इंडिया आघाडी मित्रपक्षातर्फे गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र निवडणूक संदर्भात आढावा बैठक आज पार पडली. बैठकीला महाविकास आघाडी व घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचाराचे नियोजन राज्याचे विरोधि पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव मा.संदीप पाटील गड्डमवार व तसेच चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.दिनेश पाटील चिटणुरवार यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी माजी जि.प.सदस्य व जेष्ठ  काँग्रेस पदाधिकारी मा.पांडुरंगजी तांगडे,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.यशवंत बोरकुटे, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,महिला तालुका अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,कृषी उत्पण बाजार समिती सभापती मा.हिवराज पाटील शेरकी,उपसभापती मा.दिवाकर पाटील भांडेकर, सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,नगरपंचायत सावलीच्या अध्यक्षा सौ.लताताई लाकडे,उपंगराध्यक्ष मा.संदीप पूण्यपकर,


माजी पंचायत समिती सभापती मा.विजय कोरेवार तसेच मा.राकेश पाटील गड्डमवार, विविध कार्य.संस्था,अध्यक्ष सावली मा.मुन्नाभाऊ स्वामी, युवा तालुका अध्यक्ष मा.किशोर कारडे,युवा शहर अध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार,महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी,व्याहाड खुर्दच्या सरपंच सौ.सुनिता उरकुडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.निखिल सुरमवार,संचालक मा.खुशाल लोडे आदी उपस्थित होते.


बैठकी प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधित करताना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी " केंद्रातील मोदी सरकार हे बहुजन समाज तसेच संविधान विरोधी असून देशातील कारभार हे हुकूमशाही पद्धतीने चालविण्यात येत आहे.


देशात उपासमारीची वेळ येत आहे,बेरोजगारी व वाढत्या भाववाढीमुळे देशातील जनतेत भाजप सरकार विरोधात जनाक्रोश वाढत आहे व जनताच यांना धडा शिकवेल येत्या काळत काँग्रेसच देशात नंबर वन पक्ष असेल आम्ही देशाहितासाठी कट्टीबद्ध आहोत,त्यासाठी नागरिकांनी काँग्रेस पक्षाला जनाधार देण्याचे तसेच गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी उभे असलेले इंडिया आघाडी प्रणित काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !