हातपंप देखभाल दुरुस्ती कामगारांचे मानधन वाढ व इतर मागण्या करीता जिल्हा परिषद समोर बेमुदत आमरण उपोषन सुरु...!
एस.के.24 तास
गडचिरोली : दि,16//02/2026 सोमवार पासुन हातपंप देखभाल दुरुस्ती कामगाराचे मानधन वाढ व इतर मागण्या करीता जिल्हा परिषद समोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले. सविस्तर वृत्त असे की,हातपंप देखभाल दुरुस्ती व कामगार संघटना (संलग्न आयटक) तर्फे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब,जिल्हा परिषद गडचिरोली. यांना दिनांक,21/10/2024, दि.17/06/2025, दि.23/01/2026, दि.03/02/2026 पत्र व्यवहार करण्यात आला. तोडगा न निघाल्याने शेवटी बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आला.
हातपंप देखभाल व दुरुस्ती कामगार सन,1986 पासुन जि.प.अंतर्गत अत्यंत अल्पशा मानधनावर ग्रामीण पाणी पुरवठा योजना विभागात काम करीत असुन जिल्हयातील सर्व हातपंपाची देखभाल व दुरुस्ती, हातपंप देखभाल दुरुस्ती पंचायत समिती हातपंप दुरुस्ती पथकावर पाणी पुरवठा योजना अविरत सुरु ठेवण्यासाठी काम करीत आहेत. अत्यंत मेहनतीची काम ग्रामीण जनतेला पिण्याचे पाणी मिळण्याकरीता सतत काम करुन जिल्हा प्रशासन हातपंप दुरुस्ती कामगारांच्या मानधन वाढीकडे यापुर्वी अनेकदा मागणी करुनही लक्ष देत नाही आहे.
जि.प.अंतर्गत शाखा अभियंता यात्रिकी,मदतनीस यांचे व आमचे संपुर्ण पगार जि.प.उत्पादनातुन वेतन व भत्ते होत होते. परंतु महाराष्ट्र शासनाने दि,15/11/2024 पासुन शाखा अभियंता यांत्रिकी,मदतनिस यांचे वेतन व भत्ते व सेवानिवृत्ती शासनामार्फत होत असल्याने जि.प.ला तेवढा बोजा कमी झाला असल्याने अत्यंत अल्पशा मानधनावर काम करणाऱ्या हातपंप देखभाल व दुरुस्ती कामगार यांचे मानधन वाढविणे आता जि.प.ला सोपे झाले असल्याने मानधन वाढविण्यासाठी काही हरकत नाही, तरी सुद्धा मानधन वाढविण्यात आलेला नाही.
तसेच मानधनाबाबत वरीष्ठांना विचारणा केल्यानंतर त्यांच्या कडून निधीची कमतरता असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नियमित मानधन सुद्धा दिले जात नसुन दर महीन्याला वेळेवर मानधन देण्यात येत नसल्याने कामगारांना आपले उदरनिर्वाह करणे कठीनाचे होत आहे. हातपंप नियमित चालु ठेवून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होवु नये. याकरीता सतत काम करणाऱ्या कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हातपंप दुरुस्ती कामगारांकडून यापूर्वी देखील अनेकदा निवेदने सादर करून सुद्धा मागण्यांची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच दिनांक 03/02/2026 रोजी दिलेल्या निवेदनानुसार मानधनात वाढ व इतर मागण्या पूर्ण झाल्या नाही.
म्हणून दि.16/02/2026 पासुन आमरण उपोषण करण्याचे निवेदन दिलेले होते. तरी आजपर्यंत मानधन व इतर मागण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या निवेदनावर विचार विनीमय करून मागण्या पुर्ण न झाल्याने नाईलाजास्तव सदर कामगारांकडुन जिल्हा परिषद गडचिरोली कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषन सुरू करण्यात आले, असुन होणाऱ्या परिणामाची जबाबदारी जिल्हा प्रशासन गडचिरोली यांचेवर राहील. त्याकरीता दि,16/02/2026 पासुन जिल्हा परिषद समोर हातपंप दुरुस्ती कामगारांनी बेमुदत आमरण उपोषणाला बसुन खालील मागण्या त्वरीत पुर्ण करण्यासाठी मागणी केली आहे. यावेळी उपोषणकर्ते,निलकंठ साखरे,जर्नाधन गावतूरे, गुरुदेव कुमरे,देविदास दुर्गे, पोचन्ना चेकला,व सोबतचे 60 कर्मचारी, कॉ.देवराव चवळे अध्यक्ष (आयटक),कॉ.प्रकाश ठलाल सहसचिव (आयटक), कॉ.जलीलखाँ पठाण सचिव (आयटक), उपस्थित होते.
प्रमुख मागण्या : -
1) ट्रायसेन यांत्रिकी कामगारांना वाढत्या महागाईनुसार 25 ते 30 हजार मानधन वाढविण्यात यावे.
2) ट्रायसेम यांत्रिकी कामगार यांना शासकीय सेवेत सामावुन घेण्यात यावे.
3) ट्रायसेम यांत्रिकी कामगारांचे दर महीण्याचे मानधन महीण्याच्या 5 तारखेच्या आत नियमित रित्या अदा करण्याची तरतुद करण्यात यावी.
4) वर्षाला 15 पगारी सुट्ट्या देण्यात यावे.
5) करारनाम्यातील अटी व शर्ती शिथील करण्यात यावे.
6) हातपंप देखभाल व दुरुस्ती व्यतिरिक्त कोणतेही काम सांगण्यात येवु नये.
7) दर वर्षाला गणवेशाची रक्कम 2500/- देण्यात यावी.

