बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने मॅजिकच्या नवीन अभ्यासिकेचा शुभारंभ. ★ भिसी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध, लाभ घेण्याचे आवाहन.

बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने मॅजिकच्या नवीन अभ्यासिकेचा शुभारंभ.


★ भिसी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध, लाभ घेण्याचे आवाहन.


एस.के.24 तास


चिमुर : दिनांक 14 एप्रिल: चिमूर तालुक्यातील डॉ. रमेशकुमार गजबे शिक्षा संकुल येथे सुरू असलेल्या मॅजिक उपक्रमांतर्गत नवीन अभ्यासिकेचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्ताने करण्यात आला. याप्रसंगी मॅजिकचे माजी विद्यार्थी चंद्रशेखर सावसाकडे विशेष शिक्षक दिल्ली 




व भूषण ननावरे वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक आणि मॅजिकचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.  या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला  माल्यार्पण करून त्यांना  अभिवादन करण्यात आले.तसेच उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला.


ब्राईटएज फाउंडेशन भिवापूरच्या माध्यमातून सुरू असलेल्या मॅजिक उपक्रमांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन, वाचनालय, भोजन व निवास उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच रक्षक उपक्रमांतर्गत पोलीस भरतीचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे.


 सद्यस्थितीत 55 विद्यार्थी व विद्यार्थिनी या मॅजिक अभ्यासिकेचा लाभ घेत आहे. या अभ्यासिकेची क्षमता फक्त 50 विद्यार्थ्यांची होती. आता ती वाढवून 100 करण्यात आली आहे. यामुळे आता भिसी परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेचा लाभ घेता येणार आहे. तरी परिसरातील विद्यार्थ्यांनी मॅजिक अभ्यासिकेचा लाभ घ्यावा,असे आवाहन मॅजिक परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


ही अभ्यासिका लोकवर्गणीतून उभी करण्यात आली असून या अभ्यासिकेला लागलेला 60 हजार रुपयाचा खर्च समाजातील दानशूर व्यक्तींनी केला. त्यामध्ये ज्ञानेश्वर चौके, पराग दोडके, शीतल राने, जितेंद्र नारनवरे,  ज्योती श्रीरामे, अभिषेक घोडमारे, अतुल वाकडे, धनंजय गुडदे, गोविंदराव चौधरी, भाऊराव श्रीरामे, रमाकांत गजबे, हितेश नागोसे, गुरुदेव नन्नवरे,


 शेषराव नारनवरे, विजय ननावरे, सुधाकर श्रीरामे, राजेंद्र जांबुडे, दिगंबर गरमडे, नागनाथ दडमल, मनोज नारनवरे, रवींद्र  धारणे, ज्ञानदेव चौके,डाॅ.दिनकर दोडके,प्रभुदास चौधरी,दडमल साहेब चामोर्शी, एकनाथ गजबे व इतर देणगीदारांचा समावेश आहे. या अभ्यासिकेच्या बांधणीचे काम पेटगाव येथील किरणकुमार मगरे यांनी मोफत करून दिले. या अभ्यासिकेसाठी लागणारी इमारत डॉ रमेशकुमार गजबे यांनी उपलब्ध करून दिली.


 शिक्षा संकुलमधील वातावरणातील अल्हाददायक व शांत असून अभ्यासासाठी अतिशय अनुकूल आहे.त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेचा निश्चितच लाभ होईल. अशी भावना शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त करून दाखवली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !