१६ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण.
★ दोघींना मिळणार प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस.
एस.के.24 तास
गडचिरोली : जहाल नक्षल नेता नांगसू मनकू तुमरेटी उर्फ गिरीधर याने पत्नी संगीतासह आत्मसमर्पण केल्यानंतर आठ दिवसांत आणखी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे वय,28 वर्ष रा.झारेवाडा ता.एटापल्ली) व शशीकला उर्फ चंद्रकला उर्फ सुनंदा उर्फ मनीषा उईके वय,29,रा. कटेझरी ता.धानोरा) अशी त्यांची नावे असून दोघांवर १६ लाखांचे बक्षीस होते.