लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जिल्हाध्यक्षांना सुपारी देण्याचा प्रयत्न. - प्रतिभा धानोरकर यांचा आरोप
एस.के.24 तास
चंद्रपूर : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार घरी बसून निवडून यावे तथा लोकसभेची उमेदवारी मला मिळू नये यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी राजुराचे आमदार सुभाष धोटे यांना ‘" सुपारी " देण्याचा प्रयत्न केला. पैशाने मॅनेज करण्याचा प्रयत्न केला.मात्र आमदार धोटे विकल्या गेले नाही,अशा शब्दात नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वपक्षीय नेत्यांचा समाचार घेतला. यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.