संपत्तीच्या वादातून भावाने केली बहिणीची हत्या,भावाला अटक. 📍मध्यस्थीला गेलेल्या आईला गंभीर दुखापत.

संपत्तीच्या वादातून भावाने केली बहिणीची हत्या,भावाला अटक. 


📍मध्यस्थीला गेलेल्या आईला गंभीर दुखापत.


एस.के.24 तास 


भद्रावती : संपत्तीच्या वादातून एका तरुणाने आपल्या सख्ख्या बहिणीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना भद्रावती येथे घडली.भावंडांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या आईला सुद्धा या दुर्घटनेत गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा खोल तपास करत आहेत.


चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात घडली आहे. आरोपीचे नाव सुरज शंकर भोंडे वय,28 वर्ष असून संजीवनी शंकर भोंडे वय,32 वर्ष असे मृत बहिणीचे नाव आहे,तर पुष्पा शंकर भोंडे वय,55 वर्ष असे गंभीररीत्या जखमी झालेल्या आईचे नाव आहे. 


तीन - चार दिवसांपासून भोंडे कुटुंबीयांमध्ये संपत्तीतून वाद सुरु होते. त्यातूनच ही घटना घडल्याचे सांगितले जाते. या वादादरम्यान आरोपी आणि त्याच्या बहिणीमध्ये हाणामारी झाली. हाणामारीत भावाने बहिणीची हत्या केली.


या घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी सूरजला अटक केली असून पोलिसांनी वडिलांना देखील ताब्यात घेतले आहे.घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !