ने.हि.महाविद्यालयात 'एन.ई.पी २०२०' वर कार्यशाळा : प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,१९/०७/२४ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० म्हणजेच 'एन.ई.पी २०२०' वर बी.ए,बी काॅम आणि बी.एस्सी प्रथम विद्यार्थ्यांसाठी नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डी एच गहाणे होते,त्यांनी एन.ई.पी.चे महत्व व त्यातील निवडप्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.यानंतर कला शाखा प्रमुख डॉ राजेंद्र डांगेनी कलाशाखेबद्दल, वाणिज्य विभागप्रमुख डॉ रेखा मेश्रामांनी वाणिज्य शाखेबद्दल आणि भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ रतन मेश्रामांनी विज्ञान शाखेबद्दल विद्यार्थ्यांना सचित्र मार्गदर्शन केले.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांनी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत करुन त्यांना मोलाचा सल्ला दिला.
या कार्यशाळा कार्यक्रमाचे संचालन डॉ आशिष साखरकर तर आभार डॉ राजू आदेनी मानले.यशस्वीतेसाठी नॅक समिती समन्वयक डॉ किशोर नाकतोडे, डॉ अरविंद मुंगोले, डॉ योगेश ठावरी,डॉ येरपुडे मोलाचे सहकार्य केले.कार्यशाळेला समस्त प्राध्यापकवृंद व प्रथम वर्षाच्या विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


