विदर्भ राज्य निर्माण करू म्हणणारे भाजपवाले गेले कुठे ?
★ विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आंदोलन १० ऑगष्ट ला.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली : विदर्भ राज्य निर्माण व्हावे असे अनेकांना वाटतो.विदर्भाचा विकास करायचा असेल तर विदर्भ राज्य निर्माण व्हावे यासाठी गेल्या २५ -३० वर्षापासून राजे सत्यवान महाराज जय विदर्भ पार्टी यांनी आपल्या हयातीत अनेक आंदोलने केली आता १० वर्षापासून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी,आमदार वामनराव चटप,अरुण केदार,अंकुश वाघमारे,नाशिरकर , दहेगावकर ' राजेंद्रसिंह ठाकुर , अरुण पा. मुनघाटे , नाशिर शेख आदि प्रमुख नेते १० ऑगस्टला नागपूर विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकविण्याचे आंदोलन करणार आहेत.
यात संपूर्ण विदर्भातील विदर्भवादी उपस्थित राहणार आहेत. विदर्भ राज्याला शिवसेनेचा नेहमीचाच विरोध राहणार आहे.परंतु २०१० साली भाजपाची सत्ता नव्हती तेव्हा महाराष्ट्रातील भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांनी विदर्भ राज्य निर्माण व्हावे यासाठी पदयात्रा काढली होती.
केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता येवू द्या आम्ही विदर्भ वेगळा करू असे म्हणणारे देवेंद्र फडणविस , सुधिरभाऊ मुनघंटीवार , मुंडे साहेब , भाऊसाहेब फुंडकर , विनोद तावडे , आदि नेत्यांनी दुष्काळावर एकच पर्याय विदर्भ राज्याची निर्मिती , म्हणुन ओरडणारे आज गेल्या १० वर्षापासून सत्तेत आहेत आता ते उपमुख्यमंत्री , मंत्री म्हणुन पद भोगत आहेत.
तर केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र असे असतांना व केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असताना सुद्धा मात्र भाजपवाले विदर्भ राज्य वेगळा होवू देत नाही.नव्हे तर वेगळ्या विदर्भा बाबतीत एक शब्दही बोलत नाही. म्हणुन विदर्भातील जनता म्हणतो की , विदर्भ राज्य निर्माण करू म्हणणारे भाजपवाले आता गेले कुठे ?