झाडूचा राजा अन् बाबांचे बाबा म्हणजे गाडगेबाबा. - डॉ.धनराज खानोरकर
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी - ०७/०३/२६ संत हे अनंत असतात.जगाचे आघात सोसून ते समाजाला दिशा देण्याचे काम करतात, त्यांना संत म्हणतात.असे समाजसंत गाडगेबाबा हे एकमेव बाबांचे बाबा आहेत की,ज्यांनी झाडू हे शस्त्र मानून स्वच्छतेचा मंत्र दिला.भोंदू बाबांचा पर्दाफाश केला.
शिक्षणाचे माहात्म्य आणि माणसाचे कर्म यावर कीर्तनाच्या माध्यमातून विचार पेरले,त्यामुळे खरा झाडूचा राजा अन् बाबांचा बाबा गाडगेबाबा होय,असे काव्यमय मार्मिक विवेचन प्रसिद्ध,कवी लेखक डॉ धनराज खानोरकरांनी व्यक्त केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात 'संत गाडगेबाबा : व्यक्ती व विचार' विषयावर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ युवराज मेश्राम उपस्थित होते.गाडगेबाबांकडून मानवी स्वच्छता व पर्यावरण स्वच्छता, शिक्षणाची आवश्यकता शिकण्यासारखे आहे,असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ शेकोकरांनी सांगितले.संचालन व आभार जगदिश गुरनुलेंनी केले.कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

