एन.ई.पी.२०२० प्रभावी अंमलबजावणीतून उद्योग विकासाला चालना मिळेल. - कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,०८/०७/२४ " नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हा विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून आखण्यात आला आहे. या धोरणामुळे एकंदरीत विद्यार्थ्यांचा,शिक्षकांचा व पर्यायाने समाजाचा फायदाच होईल.
याच्या प्रभावी अंमलबजावणीतून त्या त्या परिसरात उद्योगविकासाला चालना मिळणार आहे " असे मार्मिक विवेचन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारेंनी केले.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात ' 'एन.ई.पी.२०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्लटर नुसार संस्थाध्यक्ष व प्राचार्यांची सभा कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन बोलत होते.
या सभेचे मार्गदर्शक म्हणून गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे प्र - कुलगुरू डॉ श्रीराम कावळे तर प्रमुख उपस्थितीत नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव मा.अशोक भैया,समन्वयक प्राचार्य डॉ डी एच गहाणे,सहसमन्वयक उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर,नॅक समन्वयक डॉ किशोर नाकतोडे, डॉ असलम शेख विचारपीठावर उपस्थित होते.संस्थाध्यक्ष मा.अशोक भैयांनी पाहुण्यांचे यथोचित स्वागत केले.यानंतर प्र - कुलगुरू डॉ.कावळेंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक व भूमिका प्राचार्य डॉ डी एच गहाणे तर संचालन डॉ असलम शेख व आभार डॉ किशोर नाकतोडेंनी मानले.सभेला प्राचार्य डॉ माधव वरभे, प्राचार्य डॉ संजय सिंग, प्राचार्य डॉ कामडी, प्राचार्य डॉ देवेश कांबळे, प्राचार्य डॉ देशमुख व इतर प्राध्यापकवृन्द, शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.यशस्वीतेसाठी डॉ अरविंद मुंगोले,डॉ राजेंद्र डांगे,डॉ रेखा मेश्राम,प्रा विनोद नरड यांनी सहकार्य केले.


