देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कोंढाळा परिसरात रेल्वे कामासाठी सुरू असलेल्या मुरुम उत्खननावरून १७ फेब्रुवारी च्या मध्यरात्री तुफान हाणामारी. 📍आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या आमदारसह 6 जणांवर देसाईगंज (वडसा) पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कोंढाळा परिसरात रेल्वे कामासाठी सुरू असलेल्या मुरुम उत्खननावरून १७ फेब्रुवारी च्या मध्यरात्री तुफान हाणामारी.


📍आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या आमदारसह 6 जणांवर देसाईगंज (वडसा) पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.


एस.के.24 तास 


देसाईगंज (वडसा) : गडचिरोली देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरात रेल्वे कामासाठी सुरू असलेल्या मुरुम उत्खननावरून १७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री तुफान हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी एका मजुराला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे आमदार रामदास मसराम यांच्यासह सहा जणांविरुद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या घटनेत कुणाल विकास राजगडे वय,24 वर्ष रा.निमगाव हा मजूर जखमी झाला असून त्याच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढाळा येथे रेल्वेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.मंगळवारी मध्यरात्री सुमारे दीड वाजताच्या सुमारास मुरुम उपसा सुरू असताना आमदार मसराम हे आपल्या पाच सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.येथे मुरुम उत्खनन कसे सुरू आहे.अशी विचारणा करत त्यांनी उपस्थित मजुरांशी वाद घातल्याची माहिती आहे.


यावेळी कुणाल राजगडे याने तहसील कार्यालयाची रीतसर परवानगी असल्याचे सांगत,अधिक माहितीसाठी कंत्राटदाराकडे चौकशी करण्याचा सल्ला दिला. यानंतर वाद विकोपाला गेला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार,चिडलेल्या जमावाने काठी व हाताबुक्क्यांनी मारहाण केली.यात कुणाल गंभीर जखमी झाला.


या प्रकरणी निवृत्त शिक्षक धनपाल मिसार,आमदार रामदास मसराम,अमोल मिसार, सागर वाढई, ज्ञानदेव पिलारे आणि चालक विजय भुरले यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ११८(१), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून हल्ला केल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे.


एका विद्यमान आमदारावर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही मारहाण केवळ मुरुम उत्खननाच्या वादातून झाली की यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !