जिल्हाधिकारी कार्यालय समोर अवैध रेती उत्खनना विरोधी सुरू असलेले साखरा येथील उपसरपंच बोरकुटे व साखरे मॅडम आंदोलनाला वंचित गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे यांचा पाठिंबा.
एस.के.24 तास
गडचिरोली : अवैध रेती उत्खनना विरोधी सुरू असलेले साखरा येथील उपसरपंच बोरकुटे मॅडम व साखरे मॅडम यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे व सामाजिक कार्यकर्ते सुरेश कन्नमवार यांनी भेट देऊन त्यांना आपला पाठिंबा घोषित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीशी आहे असे आश्वासित केले.
जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहू द्या.वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत आहे .अशी ग्वाही ठिय्या आंदोलन कर्त्याना वंचित बहुजन आघाडी गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे यांनी दिली.

