अश्विनी प्रशांत वगारे - बोरकुटे अर्थशास्त्र विषयात सुवर्ण पदक व्याहाड बुज येथील सामाजिक कार्यकर्त्या तर्फे अश्विनी चे अभिनंदन.

1 minute read

अश्विनी प्रशांत वगारे - बोरकुटे अर्थशास्त्र विषयात सुवर्ण पदक व्याहाड बुज येथील सामाजिक कार्यकर्त्या तर्फे अश्विनी चे अभिनंदन.


एस.के.24 तास


सावली : सावली तालुक्यातील व्याहाड बूज. येथील अश्विनी प्रशांत वगारे - बोरकुटे ही विद्यार्थिनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून इ.स. 2024 मध्ये  उन्हाळी परीक्षेत अर्थशास्त्र या विषयात संपूर्ण गोंडवाना विद्यापीठातून सुवर्णपदक मिळवण्याची मानकरी ठरली आहे . विद्यापीठाच्या १२ व्या दीक्षांत समारंभात गडचिरोली येथे अश्विनी ला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आला. 

    


लहान पणापासून अत्यंत चाणाक्ष बुद्धिमत्तेची असलेली अश्विनी ही पेडगाव येथील रहिवासी असून तिचे १० वी पर्यंतचे शिक्षण  कापसी येथे झाले.सध्या ती व्याहाड बूज.येथील रहिवासी झालेल्या आहेत.विशेष म्हणजे अश्विनी ही घरी अभ्यास करूनच हे यश संपादन केलेले आहे. 

      

अश्विनीला मिळालेल्या या यशाबद्दल व्याहाड बूज. येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल गुरनुले, सुनील बोमनवार,सचिन इंगुलवार,दिपक गद्देवार,योगेश निकोडे,हिम्मत मोटघरे,बंडू चिप्पावार,जयंत संगीडवार,आबाजी चौधरी  यांनी तिच्या घरी भेट देऊन अभिनंदन केलेले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !