दोन दशकांपासून नक्षलवादी चळवळीत कार्यरत हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेले ; 3 जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक -14/02/2025 दोन दशकांपासून नक्षलवादी चळवळीत कार्यरत व सदस्य ते उपकमांडर अशी मजल मारून अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेला जहाल नेता विक्रम ऊर्फ मंगलसिंग याने पत्नी वसंती उर्फ सुरेखासह अन्य एक जहाल महिला अशा एकूण तिघांनी 14 फेब्रुवारी रोजी आत्मसमर्पण केले.
त्यांच्यावर शासनाने 38 लाखांचे बक्षीस ठेवले होते.11 फेब्रुवारीला भामरागड तालुक्यातील छत्तीसड सीमेवरील दिरंगी आणि फुलनार जंगलातील चकमकीत महेश नागुलवार या जवानाला वीरगती प्राप्त झाली होती.या पार्श्वभूमीवर या तिघांच्या आत्मसमर्पणनाने नक्षलविरोधी अभियानाला बळ मिळाले आहे.