केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याने बांधलेला पूर्व नागपुरातील उड्डाणपूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खचून एका युवकाच्या कारचे नुकसान ; निकृष्ट दर्जाचे काम कारवाई होणार का ?
★ " स्ट्रक्चरल ऑडीट " करण्यात यावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली.
एस.के.24 तास
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याने बांधलेला पूर्व नागपुरातील उड्डाणपूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खचून एका युवकाच्या कारचे नुकसान झाले.या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी कारमालकाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तसेच या पुलाची बांधकाम करण्याची जबाबदारी असलेल्या ‘एनएचएआय ‘ अधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे.