विद्यमान जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी चौकशीचे आदेश दिले असून थेट मंत्रालयात प्रस्ताव पाठवणाऱ्या संस्था " रडार " वर.
📍जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीविना अल्पसंख्याक शाळांचा प्रस्ताव मंत्रालयात ? जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू.
एस.के.24 तास
गडचिरोली : बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यात नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीतून अटक झाली.त्यामुळे या भरती घोटाळ्याच्या गडचिरोली संबंधांची चर्चा सुरू आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना बायपास करून संस्थाचालकांनी अल्पसंख्याक दर्जासाठीचे प्रस्ताव थेट मंत्रालयात पाठवल्याची आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे.विद्यमान जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले असून थेट मंत्रालयात प्रस्ताव पाठवणाऱ्या संस्था " रडार " वर आहेत.
या आडून मोठ्या प्रमाणात उलाढाल केल्याची माहिती आहे.याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी पंडा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.त्यामुळे नियमबाह्य अल्पसंख्याक दर्जा मिळवून पदभरती करणाऱ्या संस्थाचालकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
कोणत्या तालुक्यात किती अल्पसंख्याक शाळा ?
" लॉबी " सक्रिय : -
अल्पसंख्याक दर्जा मिळविण्याची नियमावली काय आहे, त्याच्या प्रस्तावाची प्रक्रिया कशी असते,याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.नियमबाह्यरित्या मंजुरी मिळवली असेल तर योग्य ती कारवाई केली जाईल. - अविश्यांत पंडा,जिल्हाधिकारी गडचिरोली