शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत क्रांती लोखंडे जिल्हास्तरावर 3 तर तालुका स्तरावरील 12 पुरस्काराने सन्मानित.

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत क्रांती लोखंडे जिल्हास्तरावर 3 तर तालुका स्तरावरील 12 पुरस्काराने सन्मानित.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपुरी - ०८/०५/२५ राज्यातील  सर्व माध्यमांच्या शाळा करिता शैक्षणिक सत्र 2023-24 या सत्रात शिक्षक,प्रशिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा  प्रत्येकी सहा गटातून एकूण 28 विषयासाठी स्पर्धा घेण्यात आली होती.



या स्पर्धेचे  बक्षीस वितरण सोहळा दिनांक 6 मे 2025 ला चंद्रपूर येथील डॉ.श्याम प्रसाद  मुखर्जी वाचनालयातील भव्य कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह(भा. प्र.से.) जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. 


या स्पर्धेत ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोसंबी (ख.) येथील सहाय्यक शिक्षिका क्रांती लोखंडे यांनी या स्पर्धेत जिल्हा स्तरावर  3 तर तालुका स्तरावरील 12 पुरस्कार एकूण 15 पुरस्कार मिळवून ब्रम्हपुरीचे  इतिहासात नाव  कोरले आहे. सदर पुरस्कार  चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी  अधिकारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 


क्रांती लोखंडे यांच्या यशाबद्दल तसेच उत्तम कार्याबद्दल त्यांचा झालेला गौरव यासाठी  शाळेचे मुख्याध्यापक, हळदा केंद्राचे केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी तसेच ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मंडळींनी त्यांच्या उत्तम कार्याबद्दल त्याचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !