समाज व शिक्षकांशी ऋणानुबंध जपणे ही मोठी उपलब्धी. - अशोक भैया
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी - ०८/०५/२५ आपल्या आयुष्यात शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत अनेक शिक्षक व समजशील व्यक्ती येतात. त्यातील मोजकेच आयुष्याला दिशा देणारे ठरतात. तसेच शिक्षकांच्या जीवनातही असंख्य विद्यार्थी येतात, पण ऋणानुबंध जपणारे विद्यार्थी फार थोडेच मिळतात, असे विद्यार्थी म्हणजे समाज व शिक्षकांसाठी मोठी उपलब्धी असते.
प्राचार्य डॉ. गहाणे हे उत्कृष्ट शिक्षक, विद्यार्थी व उत्तम प्रशासक ठरले, असे विचार अशोक भैया यांनी व्यक्त केले. ते प्राचार्य डॉ. धनंजय गहाणे यांनी सेवापूर्ती निमित्त आयोजित केलेल्या ऋणानुबंध सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहलताताई भैया, उपाध्यक्ष श्री. प्रकाशजी भैया, श्री. भास्करराव उराडे, श्री. मोहनलाल भैया, श्री. राकेशजी कऱ्हाडे, श्री. सुभाषजी बजाज, प्रा. जी. एन. केला, डॉ. संजीव मोहरील श्री. हुकुमचंदजी कशीवार व डॉ. एन. कोकोडे इत्यादी उपस्थित होते.
ऋणानुबंध सोहळ्यात अनेक मान्यवर शिक्षक, प्राध्यापक, सहकारी व पदाधिकारी यांचा शॉल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गहाणे कुटुंबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त करून डॉ.गहाणे यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.संचालन केतन गहाणे व सौ. वेदिका गहाणे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. तनुजा गहाणे तर आभार डॉ.धनंजय गहाणे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. अंजली गहाणे, डॉ. मोहन कापगते, डॉ. सुभाष शेकोकर, प्रा. प्रफुल्ल पराते, डॉ.किशोर नकतोडे, प्रा. रुपेश वाकोडीकर, प्रा. सुशील बोरकर,नंदुभाऊ खुणे, रूपराम गहाणे, खेमराज डोंगरवार, फाल्गुन गहाणे, देवयानी गहाणे इत्यादीनी परिश्रम घेतले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.