अशोकजी भैयांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना,विद्यार्थ्यांना फळ वाटप कार्यक्रम.
अमरदीप लोखंडे : सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०४/०५/२५ ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव तथा ब्रम्हपुरी नगराचे प्रथम नगराध्यक्ष अशोक किसनलालजी भैया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना व स्व.मदनगोपालजी भैया येथील छात्रवासातील छात्रांना फळे वाटण्यात आले.यावेळी नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील कार्य.प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर
शांताबाई भैया महिला महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.वरभे सर,प्रा मेजर विनोद नरड,डॉ.राजेंद्र डांगे, डॉ.रेखा मेश्राम,डॉ.किशोर नाकतोडे,डॉ.अरविंद मुंगोले,पर्यवेक्षक प्रा.आनंद भोयर,अधीक्षक संगीता ठाकरे सह संस्थेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात हिरहिरिने भाग घेतला.