ग्रामपंचायत कोंडेखल चा भोंगळ कारभार ; गावातील विकास कामावर ग्रामपंचायत सरपंच पदाधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
📍मुरर्लीधर शेरकी ते अरुण कंकडालवार यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे दोन ते तीन महिन्यात नालीला तडे. - चौकशी करून सरपंच कंत्राटदारावर कारवाई करण्याचे सुरेश कन्नमवार यांची मागणी.
सुरेश कन्नमवार मुख्य संपादक - एस.के.24 तास
सावली : सावली तालुक्यातील कोंडेखल येथील गेल्या 5 वर्षापासून निवडून आले.तेव्ह पासून आजपर्यंत सरपंच पदाधिकारी कार्यरत आहेत.गावातील विकास कामावर सरपंच व सदस्य आपआपल्या वार्डात ढुंकून सुद्धा पाहत नाही.ग्रामसभा बरोबर घेत नाही.मनमानी कारभार सुरु असते.
ग्रामपंचायत ला 14 /15 वा वित्त आयोगाचा निधी उपलब्ध असून कुठे खर्च केला म्हणून नागरिक विचारले कि उडवाउडवीचे उत्तर देतात.मग निधी चा कुठ उपयोग केले 5 वर्षात कुठ विकास काम केले की नाही याची चौकशी झाली पाहीजे अशी गावातील नागरीकांची मागणी आहे.
शिक्षण - आरोग्य अंगणवाडी वर जो निधी खर्च करायचा आहे.तोआजपर्यंत खर्च झाला नाही. कोरोणा काळात अंगणवाडी सेविका चा भत्ता मिळालेला नाही. अंगणवाडी मध्ये पाण्याची सुविधा नाही.शौचालय ची सुविधा नाही.परीसरातील साफ सफाई केलेली नाही.
अंगणवाडी ला लागूण पाण्याची टाकी आहे. तिथे कचरा साफ न केल्याने तिथे परवा साफ निघाला अंगणवाडी सेविका माहिती दिली असता टाकी जवळील कचरा साफ करण्यात आला.लहाण मुले अंगणवाडी परीसरात खेळत असतांना काही अनुसुचित घटना घडल्यास जबाबदारी घेणार का ? असा प्रश्न उद्भवत आहे.ग्रामपंचायत पदाधिकार्यांना गावातील समस्या दिसत नाही का ? असा संतप्त सवाल नागरीक करीत आहेत.
ग्रामपंचायत मध्ये आज पावतो किती निधी आला.कोणत्या विकास कामामध्ये खर्च झाला.हे गूढ निर्माण झालेला आहे.ग्रामपंचायत गावातील नागरीकांना केराची टोपली दाखवत आहेत.
गेल्या तिन ते चार वर्षापासून दामोधर पेंन्दोरकर ते बंडू कन्नमवार यांच्या घरापर्यंत दोन्ही साईड च्या नाल्या बुजून आहेत.वारंवार ग्रामपंचायत मध्ये सरपंच यांना सांगून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुण आजपर्यंत नाली उपसा केले नाही.पाणी साचते पाण्याचा निचरा होत नाही.येणाऱ्या पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास ग्रामपंचायत जबाबदारी घेणार का ? असा सवाल वार्डातील नागरीक करीत आहेत.
ग्रा.पं.कारभारात अनियमितता आणि दुर्लक्षामुळे नाल्या सफाई होत नाही.नालीतील कचरा आणि पाणी साचल्यामुळे दुर्गंधी येते.ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही.
मुरर्लीधर शेरकी ते अरुण कंकडालवार घरापर्यंत नाली बांधकाम करण्यात आले.परंतु 3 महीने झाले.नसतांना सुद्धा नालीला तडे गेले.अरुण कंकडालवार यांच्या घरा समोर रोड वरील माती नाली च्या साईडला टाकल्याने रोड वर खाल भाग झाल्याने भरपूर पाणी जमा होत असल्याने घराकडे जायला अडचण निर्माण होत आहे.
नाली बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले.संबधित कंत्राटदार व सरपंच ग्रामपंचायत अधिकारी व अभियंता यांच्या वर चौकशी करुण कारवाई करण्याची सुरेश कन्नमवार यांची मागणी.