सर्वांना सांभाळून समतोल साधणारे प्राचार्य डॉ.गहाणे अशोक भैया निरोप व सत्कार समारंभ.

सर्वांना सांभाळून समतोल साधणारे प्राचार्य डॉ.गहाणे अशोक भैया निरोप व सत्कार समारंभ.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,०५/०५/२५" आपण या पृथ्वीवर एक भ्रमणकर्ता म्हणून आलो आहोत. ' कर भला तो अंत भला ' उत्तम कार्य कले तर शेवटही चांगला होतो,हे निश्चित.प्राचार्य डॉ डी एच गहाणेंनी महाविद्यालयाला एक दिशा दिली.


ते उत्तम शिक्षक,चांगले प्राचार्य म्हणून त्यांची कारकीर्द राहिली. सर्वांना सांभाळून समतोल साधणारे प्राचार्य डॉ.गहाणे होते." असे विवेचन नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैयांनी केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.डी.एच. गहाणे च्या निरोप व सत्कार समारंभात बोलत होते.

    

विचारपीठावर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष स्नेहलताताई भैया होत्या तर प्रमुख अतिथीत सहसचिव अँड भास्करराव उराडे, कोषाध्यक्ष राकेश क-हाडे, ज्येष्ठ सदस्य प्रा सुभाष बजाज,प्रशांत भैया,गोपाल भैया,उपप्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर,प्रा विनोद नरड, सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे


सौ.अंजली गहाणे, समितीध्यक्ष डॉ.रतन मेश्राम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.पाहुण्यांच्या हस्ते प्राचार्य डॉ.डी एच गहाणेंचा सपत्नीक सत्कार महाविद्यालयातर्फे व शिक्षकेतर कर्मचा-यातर्फे करण्यात आला.यानंतर डॉ. Lधनराज खानोरकरांनी सन्मानपत्राचे प्रभावी वाचन केले.


उपस्थितांची भाषणे झालीत.अधीक्षक संगीता ठाकरे, डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम,प्रा रुपेश वाकोडीकरांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात स्नेहलताताई भैया म्हणाल्या, " प्राचार्य डॉ.गहाणेंनी महाविद्यालयाला प्रदीर्घ सेवा दिली.विकास केला,त्या कौशल्याचा पुढे फायदा होईल."असे मार्गदर्शन केले.

    

संचालन डॉ.मोहन कापगते,सत्कारमूर्तीचा परिचय डॉ ज्योती दुपारे तर आभार डॉ.रतन मेश्रामांनी केले.कार्यक्रमाला सत्कारमूर्तींचे आप्तस्वकीय, महाविद्यालयाचे कर्मचारी बहुसंख्यने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !